Vikas Geete : नगर : महापालिकेतील (AMC) कर्मचारी नगरकरांना मूलभूत सेवांच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांच्या गुणवंत पाल्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर शैक्षणिक (Educational) क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करावे. शिक्षण क्षेत्राबरोबरच क्रीडा व कला क्षेत्रातही करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे यावे. महापालिका कर्मचारी पतसंस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गीते (Vikas Geete) यांनी केले.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
गुणवंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
अहिल्यानगर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे संचालक सतीश ताठे,उपाध्यक्ष उषा वैराळ, महिला बँकेच्या संचालिका शोभना चव्हाण, संचालक बाबासाहेब मुदगल, तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर, संचालक बाळासाहेब पवार, श्रीधर देशपांडे, कैलास चावरे, बाळासाहेब गंगेकर, किशोर कानडे, अजय कांबळे, विजय कोतकर, गुलाब गाडे, बलराज गायकवाड, संचालिका प्रमिला पवार, उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी विक्रम मुटकुळे, उमेश देवकर, वसंत थोरात, आनंद तिवारी आदी सभासद, विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर
बाबासाहेब मुदगल म्हणाले, (Vikas Geete)
पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे प्रेरणादायी ठरते. त्यातूनच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उर्जा मिळते. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे महापालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावले आहे. सेवानिवृत्ती ही एक नवी जीवनपायरी असते, अशा वेळी आपुलकी, प्रेम व सहभावना दृढ व्हाव्यात यासाठी सत्कार सोहळा महत्त्वाचा ठरतो.