Natya Parishad Trophy : नगर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiy Marathi Natya Parishad) मध्यवर्ती मुंबई आयोजित “नाट्य परिषद करंडक” (Natya Parishad Trophy) या भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पधेर्ची अहिल्यानगर केंद्रावरील प्राथमिक फेरी २३ होणार आहे. अहिल्यानगर केंद्रासाठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईचे (Mumbai) कोषाध्यक्ष सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य क्षितिज झावरे आणि संजयकुमार दळवी, अहिल्यानगर शाखाध्यक्ष अमोल खोले आणि प्रसाद बेडेकर आहेत. सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे आणि अनंत जोशी हे केंद्र प्रमुख असून हे या स्पर्धेसाठी अहिल्यानगर केंद्रावर समन्वयक म्हणून काम बघत आहेत.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
नवोदित कलाकारांना राज्यपातळीवर कामाची संधी
महाराष्ट्रातील हौशी, प्रायोगिक कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा, नवोदित कलाकारांमधे नाट्यकलेची ओढ निर्माण व्हावी तसेच राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळावी याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे महाराष्ट्राचे समन्वयक सतीश लोटके यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असून राज्यभरातील सर्व केंद्रांवर एकूण २५२ संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविलेला आहे. सतीश लोटके, क्षितिज झावरे, संजयकुमार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर केंद्रावरील सहभागी नाट्य संस्थांची बैठक संपन्न झाली. या सभेत “नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बाबत उपस्थित सर्व संस्था प्रतिनिधी आणि संघ प्रमुखांना स्पर्धेचे नियम आणि इतर माहिती देण्यात आली. सहभागी स्पर्धकांच्या शंकांचे निरसन करीत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकांकिकांच्या सादरीकरणाचा क्रम ठरविण्यात आला.
अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर
अहिल्यानगर केंद्रावरून बारा संघ सहभागी (Natya Parishad Trophy)
अहिल्यानगर केंद्रावरून या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले असून छ. संभाजीनगर येथील तीन तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी येथील प्रत्येकी एका संघाचा या स्पर्धेत समावेश आहे. दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मातोश्री यमुनाबाई त्र्यंबक देशमुख ग्रंथालय, गंगा उद्यान जवळ, सावेडी, अहिल्यानगर येथे प्राथमिक फेरी तालीम स्वरूपात होणार आहे.
“नाट्य परिषद करंडक” स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत
सकाळी ८:०० रसाभिनय, अहिल्यानगर,(एकांकिका – देखावा)
स.९:०० नाटकंती, अहिल्यानगर,(Tackk)
स.१०:०० होप फौंडेशन अहिल्यानगर (सेकंड चान्स)
स. ११:००आपलं घर, अहिल्यानगर(कोंधट)
दु १२:०० रंगविहार, अहिल्यानगर (झिम पोरी झिम…)
दु. १:०० नटेश्वर कला व क्रीडा मंडळ, राहुरी (गुण्या गोवींदाणे)
दु. २:३० नाट्य मंडळी, छ. संभाजीनगर (परतलेले घरकुल)
दु. ३:३० लोकसाहित्य प्रकाशन, छ. संभाजीनगर (सावळा)
दु. ४:३० नाट्य दर्शन, छ. संभाजीनगर (बुजगावणं)
सायं ५:३० एस. एस. टी. आयुर्वेद महाविद्यालय, संगमनेर (Dissection)
सायं ६:३० संकल्पना फौंडेशन, कोपरगांव (ये साली जिंदगी)
सायं ७:३० वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर (नथिंग टू से)
अंतिम फेरी दि. १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान (Natya Parishad Trophy)
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्य संकूल, माटुंगा मुंबई येथे होणार असल्याची माहिती अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली.