Garbage Problem : शहरातील कचरा प्रश्नी नागरिक आक्रमक

Garbage Problem : शहरातील कचरा प्रश्नी नागरिक आक्रमक

0
Garbage Problem : शहरातील कचरा प्रश्नी नागरिक आक्रमक
Garbage Problem : शहरातील कचरा प्रश्नी नागरिक आक्रमक

Garbage Problem : नगर : अहिल्यानगर शहरात कचऱ्याची समस्या (Garbage Problem) जटील होत चालली आहे. महापालिकेकडून (AMC) कचरा संकलन केला जात असल्याचा दावा नागरिकांनी खोडून काढला जात आहे. ठिकठिकाणी कचरा पडून असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत (Health problems) असल्याचा आरोप नागरिक करत आहे. 

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधींचा खर्च

अहिल्यानगर शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत ‘शहरातील कचरा संकलनावर होतोय कोट्यवधींचा खर्च’ या मथळ्याखाली ‘आय लव्ह नगर’वर आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडलेला असल्याचे दिसत आहे. महापालिका प्रशासन सावेडी, माळीवाडा, केडगाव, बुरूडगाव या भागातून दिवसाला तब्बल १४० ते १५० टन कचरा संकलन करत आहे. त्यासाठी महिन्याला एका कोटींच्यावर महापालिका खर्च करते, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी

शहरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडून (Garbage Problem)

मात्र, प्रत्यक्षात शहरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडून असल्याचे नागरिक ‘आयलव्हनगर’ शी बोलताना सांगत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नगर शहरातला कचरा संकलन करून शहरातील नागरिकांची कचऱ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा आणून टाकाल जाईल, असा इशारा ही नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.