Heavy Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

Heavy Rain

0
Heavy Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
Heavy Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

Heavy Rain : श्रीगोंदा : पुणे (Pune) जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) भीमा, घोड नद्यांना महापूर येऊन नदीमध्ये बुधवारी (ता.२०) संध्याकाळी भिमा नदीला (Bhima River) दौंड पुलावरून १ लाख १० हजार २७३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर घोड धरणातून २० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. रात्रीतून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी

नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

नदीला आलेल्या पाण्याने आर्वी बेटाला पाण्याचा वेढा पडला आहे. महसूल प्रशासनाने भीमा व घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भीमा नदीच्या पूरपरिस्थितीची उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे यांनी भेट देऊन पाहणी केली. घोड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काष्टी, सांगावी दुमाला तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
Heavy Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

सूचना देत सतर्कतेचा दिला इशारा (Heavy Rain)

श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाला पाण्याचा वेढा पडला असून भीमा नदीला पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आर्वी बेटाला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. अडचण आली तर तत्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क करण्याच्या सूचना देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच भीमा नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्यास आर्वी बेटातील नागरिकांनी बाहेर येण्यासाठी स्पीड बोटची व्यवस्था करून ठेवली आहे. या स्पीड बोटची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.