Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल बुधवारी लोकसभेत(Loksabha) १३० व्या घटना दुरुस्ती विधेयकासह तीन विधेयके सादर केली. मात्र १३० वे घटना दुरुस्ती विधेयक (130th Amendment Bill) सादर करत असताना, विरोधकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला.या विधेयकाला विरोध करत असताना,विरोधकांनी थेट विधेयकाच्या प्रती फाडून अमित शाह यांच्या दिशेने भिरकावल्या. विधेयकांतील तरतुदीनुसार,जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात अटक झाली तर त्यांना पदावरून काढून टाकता येणार आहे.
नक्की वाचा : माजी सैनिकांची राजकीय आरक्षणाची मागणी
आता लोकसभेत मांडलेले १३० वे घटना दुरुस्ती विधेयकात नेमकं काय ?
१. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना किमान ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाच्या शिक्षेच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आणि ते सलग ३० दिवस कोठडीत राहिले तर त्यांना ३१ व्या दिवशी पदावरून काढून टाकणे बंधनकारक असेल.
२. अटकेच्या ३१ व्या दिवशी त्यांना राजीनाम्याचे बंधन असेल अन्यथा हकालपट्टी केली जाणार
३. पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात पद सोडावे लागणार
४. सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं,तुरुंगातून सत्ता चालवण, पदांचे अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक आहे.
५. नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्याने पदावरून हटवता यावं,म्हणून कायदा.
६. केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवणार
७. मुख्यमंत्री,पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार
८. राज्याच्या मंत्र्यांना ३० व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवणार
९. तुरुंगातून निर्दोष सुटल्यास,पुन्हा मंत्री,मुख्यमंत्री पंतप्रधान होता येणार
अश्या या विधेयकातील तरतुदी आहेत.
अवश्य वाचा :चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आला अन जेरबंद झाला