PMJAY : जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्यमान कार्डधारक; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन

PMJAY : जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्यमान कार्डधारक; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन

0
PMJAY : जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्यमान कार्डधारक; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन
PMJAY : जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्यमान कार्डधारक; ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन

PMJAY : नगर : जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्यमान कार्डसाठी (PMJAY) पात्र ठरले आहेत. आतापर्यंत १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड (Ayushman Card) तयार करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी केले आहे.

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना “आयुष्मान भारत वय वंदना कार्ड” च्या माध्यमातून अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

प्रत्येक सदस्याकडे आयुष्मान गोल्डन कार्ड असणे आवश्यक (PMJAY)

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वतः लाभार्थी, आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत सहज उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्यासाठी या पोर्टलवर भेट द्यावी किंवा गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान अॅप” डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी.

जिल्हा प्रशासनामार्फत ३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम (PMJAY)

लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, आयुष्यमान कार्डच्या दैनंदिन प्रगतीवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.