Aalokrushiji Maharaj : नगर : जैन धर्मामध्ये (Jainism) अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाच्या कालावधीत चोविहार (ब्याळू) करणाऱ्या जैन बांधवांसाठी महावीर चषक परिवाराच्यावतीने मार्केट यार्ड येथे चोविहार (ब्याळू) ची व्यवस्था करण्यात आली आहे. कामानिमित्त नगर शहरात येणाऱ्या जैन बांधवांना पर्युषण काळात सूर्यास्त पूर्वी भोजन व्यवस्था उपलब्ध झाल्याने मोठी सुविधा उपलब्ध झाली. महावीर चषक परिवाराने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून व जैन धर्माच्या संस्कृती-परंपरेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अलोकऋषीजी म. सा. (Aalokrushiji Maharaj) यांनी केले आहे.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर
यावेळी उपस्थिती
यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, रमेश फिरोदिया, राजेश भंडारी, अभिजीत गांधी, अनिल पोखरणा, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र चोपडा, राजेंद्र ताथेड, राजकुमार लुणिया, सीए अभय कुमार भंडारी, रवींद्र सेलोत, अशोक गांधी, संतोष बोरा, आदेश गांधी, गोपाल मनियार, प्रीतम पोखरणा, डॉ. सचिन बोरा, प्रफुल्ल मुथा, सीए आनंद गांधी, किरण पोखरणा, अतुल शेटीया, विकास सुराणा, प्रवीण शिंगवी, अनिल दुग्गड, संतोष गांधी, प्रीतम गुंदेचा, राहुल शेटीया, रुपेश भंडारी, राजेंद्र बोथरा, रुपेश कटारिया, आशिष भंडारी, आशिष पोखरणा, आनंद गांधी, अक्षय गांधी, प्रकाश भागानगरे, बापूसाहेब गोरे, पारस शेटीया, अमित पितळे, सागर चोरडिया, नील गांधी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Aalokrushiji Maharaj)
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म. सा. यांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी असून अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामुळे नेहमीच आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. महावीर चषक परिवाराचा हा चोविहार भोजन व्यवस्थेचा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे.
माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले, महावीर चषक परिवाराच्यावतीने वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षांपासून मार्केट यार्डमध्ये मर्चंटबँकेजवळ २० ते २६ ऑगस्ट या कालावधीमध्ये जैन बांधवांसाठी चोविहार (ब्याळू) ची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ दिवसाच्या कालावधीत सुमारे दहा हजार समाज बांधव या सुविधेचा लाभ घेतात. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.