NCP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – जिल्हाध्यक्ष सावंत

NCP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे - जिल्हाध्यक्ष सावंत

0
NCP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे - जिल्हाध्यक्ष सावंत
NCP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे - जिल्हाध्यक्ष सावंत

NCP : नगर : आगामी काळात होऊ घातलेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद, व नगर पंचायत निवडणुकीसाठी (Election) सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (NCP) जास्तीत जास्त जागा जिंकून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत (Ashok Sawant) यांनी केले.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर दक्षिण विभागाची महत्वपूर्ण बैठक गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली त्यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीस उपस्थित (NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अहिल्यानगर शहराचे आ. संग्राम भैय्या जगताप, पारनेरचे आ. काशिनाथ दाते सर, शेवगाव पाथर्डीचे मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील, राहुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुणराव तनपुरे, श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, सरचिटणीस राजेंद्र गुंड, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, ज्येष्ठ नेते अजित कदम, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा बारस्कर, पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे, अमृत काका धुमाळ, अशोक जायभाय, जिल्हा सचिव सचिन ढेरे, कार्यालयीन सचिव साईनाथ भगत नगर तालुकाध्यक्ष युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. अंजली आव्हाड, नगर तालुकाध्यक्ष अशोक चोभे, युवक अध्यक्ष संतोष धुमाळ, यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका व अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सोबत लढणार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानाने जागा मिळाल्या तर महा युतीसोबत तसेच ज्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे त्या भागात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने मैत्रीपूर्ण लढती होतील. आणि या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील अशा पद्धतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २९ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा येथील श्री संत शेख महम्मद महाराज मंदिर प्रांगणात होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी. या मेळाव्यास जिल्हाभरातून २५ हजाराहून अधिक लोक उपस्थित राहतील अशी तयारी करण्यात येणार आहे.

तसेच येत्या १५ सप्टेंबर पर्यंत सर्व जिल्हा व तालुक्याच्या कार्यकारिणी जाहीर होतील. मागील महिन्यापासून अहमदनगर दक्षिण मधील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. आत्तापर्यंत ९३ हजार सभासदांची नोंदणी झालेली आहे. त्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

येत्या १५ सप्टेंबर पर्यंत ओबीसी, महिला व खुल्या प्रवर्गातील आरक्षण जाहीर होईल. एका महिनाभरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच महापौर होईल. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठ्या प्रमाणावर विजयी होतील, असे ते म्हणाले.

यावेळी पारनेरचे आ. काशिनाथ दाते सर, शेवगाव पाथर्डी चे मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील, राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुणराव तनपुरे, श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, अहिल्यानगरचे शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा बारस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ओबीसी चे जिल्हाध्यक्ष इंजिनियर डी. आर. शेंडगे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, केतन क्षीरसागर, विद्यार्थी शहराध्यक्ष वैभव ढाकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अहिल्यानगर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, आमदार काशिनाथ दाते सर, कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार यांनी सत्कार केला. शेवटी संजय कोळगे यांनी सर्वांचे आभार मानले.