AMC : २० गाळेधारकांना महापालिकेची जप्ती नोटीस

AMC : २० गाळेधारकांना महापालिकेची जप्ती नोटीस

0
AMC : २० गाळेधारकांना महापालिकेची जप्ती नोटीस
AMC : २० गाळेधारकांना महापालिकेची जप्ती नोटीस

AMC : नगर : शहरातील महापालिकेच्या (AMC) गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज १ व फेज २ व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा (Notice of Action) बजावल्यानंतर आता केडगाव येथील भाग्योदय – बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार २० गाळेधारकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गाळेधारकांकडे ७८ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी असून, तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिला आहे..

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

गाळेधारकांकडे सुमारे २५ कोटींची थकबाकी

महापालिकेच्या गाळेधारकांकडे सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महापालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे.

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

वारंवार सूचना देऊनही भाडे न भरल्यामुळे नोटीस (AMC)

सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भाग्योदय व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांकडे ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच, बहुतांश करारनामे संपुष्टात आले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महापालिका प्रशासनाने जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.