Mock Drill : गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात दंगा काबू मॉकड्रील

Ganeshotsav : गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात दंगा काबू मॉकड्रील

0
Mock Drill
Mock Drill

Mock Drill : श्रीगोंदा: आगामी गणेशोत्सव (Ganeshotsav)ईद (Eid) या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची (Police Force) तयारी व सक्षमपणा तपासण्यासाठी श्रीगोंदा येथे दंगा काबू / मॉकड्रिलची (Mock Drill) रंगीत तालीम घेण्यात आली. या प्रात्यक्षिकात पोलीस विभागाने आपली तत्परता दाखवत कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे प्रात्यक्षित केले.

नक्की वाचा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; भीमा, घोड नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा

तहसील कार्यालयासमोर प्रात्यक्षिक

श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे – शनि चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – श्री संत रोहिदास चौक – झेंडा चौक – कुरेशी मोहल्ला – सिद्धार्थ नगर – श्रीगोंदा बस स्थानक – काष्टी जामखेड हायवे रोड –  छत्रपती संभाजी महाराज चौक असा रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये कर्जत उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक, ४१ कर्मचारी, पाच होमगार्ड सहभागी झाले होते. यानंतर तहसील कार्यालयासमोर दंगा काबूचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Mock Drill
Mock Drill

अवश्य वाचा : मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह पंतप्रधानांनाही हटवण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर

विविध विभागांचा आपत्कालीन सराव (Mock Drill)

या प्रात्यक्षिकात अश्रूधुराचे नळकांडे फोडत दंगा काबू योजना राबविण्यात आली. सदरील योजनेत अग्निशामक दल, रुग्णवाहिका सेवा, श्रीगोंदा नगरपरिषद तसेच आरोग्य विभाग यांनीही सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण सहकार्य दिले. एकत्रितपणे केलेल्या या सरावातून आपत्कालीन परिस्थितीत विभागांमधील समन्वय कसा साधता येतो याचे दर्शन घडले. या प्रात्यक्षिकावेळी स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना या मॉडेल योजनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून, येणारे सण शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावेत यासाठी पोलीस व इतर यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास या माध्यमातून निर्माण झाला आहे.