
नगर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनाची हाक दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र असं न करता मुंबईला जाणार, उपोषण करणार असे मनोज जरांगे म्हणत असतील आणि सनदशीर मार्ग सोडून जर ते आंदोलन करत असतील तर सरकार कारवाई करायला बसलेच आहे,असा इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेच मनोज जरांगे यांनी कागद, पेन घेऊन आरक्षणाबाबत सरकार समोर चर्चेला बसायला हवं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात (Chandrakant Patil)
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र मनोज जरांगेच्या आंदोलनाआधी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचे पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत.
अवश्य वाचा : …तर पंतप्रधानांचे ही पद जाणार;अमित शहांनी मांडलं विधेयक
एकाच माणसाने किती वेळ काम करायचं – चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
या विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीवर मी बराच काळ अध्यक्ष होतो, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं. मात्र समितीत मी आहे. माझ्या कार्यकाळात कित्येक नवीन लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय,असेही ते म्हणाले.