Fake Currency : बनावट नोटांची विक्री करणारी टोळी जेरबंद; एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  

Fake Currency : बनावट नोटांची विक्री करणारी टोळी जेरबंद; एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  

0
Fake Currency : बनावट नोटांची विक्री करणारी टोळी जेरबंद; एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  
Fake Currency : बनावट नोटांची विक्री करणारी टोळी जेरबंद; एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  

Fake Currency : नगर : बनावट नोटांची (Fake Currency) विक्री करून त्याबदल्यात खऱ्या चलनी नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local crime branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

इंद्रजित बिबीशन पवार (वय. २९), दीपक राजेंद्र भांडारकर (वय. ३२, दोघे रा. शांतीनगर, भोसरी, ता.हवेली, जि. पुणे), शरद सुरेश शिंदे (वय.२९, रा. वरंवडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जितेंद्र ममता साठे (रा. वासुंदे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर), व इतर ४ अज्ञात व्यक्ती असे पसार झालेल्या संशियितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार बनावट नोटांची विक्री करून खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी दौंडकडून अहिल्यानगर कडे एका चारचाकी मधून येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कायनेटिक चौक येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत (Fake Currency)

त्यांच्याकडून ९ लाख ५७ रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या ५०० रुपये दराच्या १२ नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक ५०० रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा असलेले १२ बंडल, तसेच ८८ भारतीय बच्चो का बैंक, ५०० रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, तसेच २० भारतीय बच्चो का बैंक २०० रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, एक चारचाकी, दुचाकी, ४ मोबाईल असा एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच दोन दिवसापूर्वी कोपरगाव तालुक्यात ९ लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे तपासत समोर आले आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस सुनील पवार, सुरेश माळी, दीपक घाटकर, हृदय घोडके, भिमराज खर्से, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळू खेडकर, मनोज साखरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.