Ganesh Chaturthi 2025 : आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही तासांवर दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवाची उत्सुकता खरंतर आपल्या सर्वांनाच असते.मात्र,तरीही गणपतीच्या संदर्भात काही धार्मिक श्रद्धा व प्रथा (Religious Belief and Practice) आहेत. अगदी त्याच पद्धतीने गणपतीच्या संदर्भातील एक प्रथा म्हणजे जेव्हा आपण गणपती घरी आणतो तेव्हा तो झाकून आणतो. मात्र,ही प्रथा का आहे याचा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का ? वाचा…
नक्की वाचा : तुळजाभवानीच्या पालखीसाठी २०० वर्ष जुना दांडा बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना
गणपतीची मूर्ती झाकण्यामागची धार्मिक परंपरा (Lord Ganesha)
खरंतर, शहरात असो वा गावी गणपती घरी आणताना तो नेहमी झाकूनच आणावा असे आपले आजी आजोबा नेहमी बजावून सांगायचे. तर, यामागे सगुण आणि निर्गुण असे दोन तत्त्व आहेत. धार्मिक परंपरेनुसार, मूर्तीचा पुढील भाग सगुण तत्त्व म्हणजेच भौतिक स्वरुपाचा असतो. आणि मागील भाग निर्गुण तत्त्व म्हणजेच अभौतिक तत्व उत्सर्जित करतो. गणपतीची मूर्ती झाकल्याने हे दोन्ही तत्त्व संतुलित राहतात अशी मान्यता आहे. तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर मूर्तीमधील दैवत्त्व पूर्णत्वास येते असं म्हटलं जातं. तसेच, बाहेरील धूळ, वारा, पाऊस अशा घटकांपासून मूर्तीचं संरक्षण करता येते.
अवश्य वाचा : तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘डू यू वाना पार्टनर’ सिरीज १२ सप्टेंबरपासून प्रदर्शित!
गणरायाची मूर्ती कशी असावी? (Lord Ganesha)
जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाला गणपतीची स्थापना करणार असाल तर, पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती घरात आणा. तसेच,मान्यतेनुसार, गणरायाची सोंड डाव्या बाजूला असावी. तसेच, मूर्ती विराजमान अवस्थेत असावी. गणपतीच्या बरोबर उंदीरमामा देखील असावा. तसेच, गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर मूर्तीची जागा जागेवरुन हलवू नये, एकदा मूर्ती विराजमान केल्यानंतर थेट विसर्जनाच्या दिवशीच तुम्ही मूर्ती हलवू शकता, असं देखील सांगण्यात आलं आहे.