Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा’ स्पर्धेत ‘तालयोगी’ ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते

Kohinoor Mall

0
Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा' स्पर्धेत 'तालयोगी' ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते
Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा' स्पर्धेत 'तालयोगी' ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते

कोहिनूर मॉलतर्फे आयोजन; सहा पथकांनी सादर केला कलाविष्कार

Kohinoor Mall : नगर : सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या ‘कोहिनूर मॉल’ने (Kohinoor Mall) नगर शहरात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. याच एक भाग म्हणून ‘कोहिनूर मॉल’ने खास गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) औचित्य साधत ‘आपली भाषा ढोल ताशा’ (Aapli Bhasha Dhol Tasha) या ढोल पथक स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. २४) केले होते. या स्पर्धेत सात ढोल पथकांनी आपला कलाविष्कार सादर केला. स्पर्धेत तालयोगी ढोल पथकाने विजेतेपद पटकावले.

Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा' स्पर्धेत 'तालयोगी' ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते
Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा’ स्पर्धेत ‘तालयोगी’ ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते

अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

ढोल पथकांना व्यासपीठ

मागील काही वर्षांपासून नगर शहर हे ढोल निर्मिती व वादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण करत आहे. ही बाब लक्षात घेत नगरमधील ढोल पथकांची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हावी तसेच सर्व ढोल पथकांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे यंदा हे दुसरं वर्ष आहे, यावर्षी नगर जिल्ह्यासह पुणे कोपरगाव या ठिकाणांवरूनही ढोल पथक सहभागी झाले होते ही स्पर्धा सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यावरील कोहिनूर मॉल येथे रविवारी (ता. २४) घेण्यात आली.

Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा' स्पर्धेत 'तालयोगी' ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते
Kohinoor Mall : आपली भाषा ढोल ताशा’ स्पर्धेत ‘तालयोगी’ ठरले महाविजेते, गणांत द्वितीय तर रुद्रनाद तृतीय क्रमांकाने विजेते

नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

रोख बक्षीस व मानचिन्ह प्रदान (Kohinoor Mall)

या स्पर्धेत नगरमधील तालयोगीसह हिंंदवी शौर्य, गणांत, रुद्रनाद व शिवतांडव, जय तुळजा भवानी मित्र मंडळ या ढोल पथकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या तालयोगीला ५१ हजार रुपये रोख व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेते गणांतला २१ हजार रोख व सन्मानपत्र तर तृतीय क्रमांक विजेते रुद्रनादला ११ हजार रोख व सन्मानपत्र देण्यात आले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून शिवसाम्राज्य वाद्यपथकाचे अध्यक्ष अक्षय बलकवडे, गर्जना वाद्यपथकाचे राजहंस मेहेंदळे यांनी काम पाहिले. कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी यांनी गेल्या दोन वर्षांपासून नगरमधील ढोल पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी, हिंदू संस्कृतीचा अभिमान व आपल्या कलेचा समृद्ध वारसा नवीन पिढीला देण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित करत आहोत, पुढच्या वर्षी आणखी मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले.