Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar : कर्जत: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठपुरावा करीत कर्जतच्या जिव्हाळयाचा प्रश्न असणारा एसटी (ST) डेपो मार्गी लावला. अल्पावधीतच तो पूर्णत्वास नेत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते उद्घाटन केले. मात्र, त्याचे श्रेय आमदार रोहित पवारांना मिळू नये, याकरिता कर्जतचा डेपो आजमितीस चालू न झाल्याने सोमवारी (ता.२५) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) आणि मित्र पक्षाच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी
२० सप्टेंबरपर्यंत एसटी डेपो सुरू करण्याचे आश्वासन
यावेळी अहिल्यानगर विभागीय नियंत्रक यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करीत १० सप्टेंबरला १० बस देणार असल्याचे लेखी पत्र दिले. तसेच २० सप्टेंबरपर्यंत कर्जत एसटी डेपो सुरू करण्याची योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देत आंदोलन स्थगित केले.
मागील अनेक वर्षांपासून कर्जत एसटी बस डेपोचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या अनेक निवडणुका या बस डेपोच्या प्रश्नावर लढवल्या गेल्या. मात्र, हा प्रश्न मार्गी लागला नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कर्जतला एसटी डेपो करण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीत दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या डेपोला मंजुरी घेत प्रगतीपथावर काम पूर्णत्वास नेले.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
प्रवाशांची गैरसोय (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar)
मविआ सरकारच्या काळात तत्कालीन परिवहनमंत्री असणारे अनिल परब यांच्या हस्ते या डेपोचे आमदार पवार यांनी उद्घाटन देखील थाटामाटात पार पाडले. उद्घाटन होऊन दोन वर्षे लोटली तरी अद्याप कर्जतचा एसटी डेपो सुरु झाला नसल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्र पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकार फक्त राजकीय श्रेयवादात कर्जतच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी खेळत असून स्थानिक नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, वृद्ध प्रवाशांची गैरसोय करण्यात धन्यता मानत आहे. पूर्वी डेपो करण्यासाठी आणि आता उद्घाटन झालेला एसटी डेपो सुरु करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ स्थानिकावर आणली असल्याचे म्हणत परिवहन मंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर आपल्या भाषणात रोष व्यक्त केला.
अखेर दुपारी २ वाजता या उपोषणाची तातडीने दखल घेत एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कर्जत बस डेपो सुरु करण्यासाठी लागणारी संपूर्ण कार्यवाही २० सप्टेंबरपर्यंत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच १० सप्टेंबरपर्यंत १० एसटी बस सुरु करण्याचे लेखी पत्र देत उपोषण स्थगित करण्यात यश मिळवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा काळदाते, बळीराम यादव, ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळुंके, शब्बीर पठाण, गुलाब तनपुरे, किरण पाटील, पोपट आबा खोसे, पूजा सूर्यवंशी, प्रीती जेवरे, सचिन सोनमळी, बाळासाहेब सपकाळ, राम कानगुडे, माऊली सायकर, डॉ. चंद्रकांत कोरडे, नितीन धांडे, रामचंद्र भोसले, अनिल पांडुळे, नानासाहेब साबळे, दीपक यादव, ज्ञानदेव लष्कर, भूषण ढेरे, नामदेव थोरात, अंगद रुपनर, अजित बापू भोसले, अमोल पाटील, काका शेळके, दत्तात्रय पोटरे, राहुल नवले, डॉ. राजेंद्र पवार, जयसिंग थेटे, मंगेश शिंदे, वृषाली घोडके, दिलीप जाधव, बाळासाहेब मराळ, रज्जाक झारेकरी, अक्षय तोरडमल, सचिन दरेकर, मनोज गायकवाड, शरीफ पठाण, काकासाहेब लांगोरे, स्वप्नील तनपुरे, अजय नेवसे, सचिन मांडगे, महेश जगताप, प्रतीक ढेरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपोषणात सहभागी झाले होते.