Randha Waterfall : अकोले: भंडारदरा (Bhandardara) परिसरातील पर्यटकांचे (Tourist) खास आकर्षण असलेल्या रंधा धबधबा (Randha waterfall) येथे काचेचा पूल (Glass Bridge) होणार आहे. या पुलामुळे येथील निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
४ कोटी ३१ लाखांचा येणार खर्च
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून, प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार या कामाची अंदाजित किंमत ४ कोटी ३१ लाख ९३ हजार ६१३ रुपये आहे. दरवर्षी हजारो पर्यटक रंधा धबधब्याला भेट देतात. पंधरा वर्षांपूर्वी दिवंगत माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रयत्नाने रंधा धबधबा परिसरात सुशोभीकरणाची कामे झाली. यात धबधब्याकडे जाणारा आकर्षक पादचारी पूल तयार करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी
धबधब्याइतकाच पर्यटकांचे ठरणार आकर्षण (Randha Waterfall)
नदीपात्रात निरीक्षण मनोरा, घाट, घोरपडा देवी मंदिराचे बांधकाम आदी कामे झाली. यामुळे वर्षभर येथे पर्यटकांची पावले वळत असतात. त्यातच आता स्कायवॉक (काचेचा पूल) साकारला जाणार आहे. त्यामुळे हा काचेचा पूल या धबधब्याइतकाच पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. आमदार डॉ. लहामटे यांनी या प्रकल्पाबाबत समाज माध्यमावरून माहिती दिली आहे. रंधा धबधबा येथे स्कायवॉक अर्थात काचेचा ब्रीज साकारला जाणार असून, त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी पुलाचे संकल्पचित्रही शेअर केले आहे.