AMC : नगर : अहिल्यानगर येथील माळीवाडा भागांमध्ये असलेल्या कपिलेश्वर तरुण मंडळाचा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) मंडपाला परवानगी सुरुवातीला देऊन ती पुन्हा नाकारण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या (AMC) जुन्या कार्यालयामध्ये म्हणजेच प्रभाग समिती कार्यालयामध्ये जाऊन अर्ध नग्न अवस्थेमध्ये त्यांनी आंदोलन (Movement) केले, यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भ मध्ये उद्या (ता. २६) सुनावणी ठेवली असल्याची माहिती कपिलेश्वर मंडळाचे अध्यक्ष ओंकार गिरवले यांनी दिली.
अवश्य वाचा : रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी
ऑनलाईन परवान्याचा सावळा गोंधळ समोर
गणेशोत्सवानिमित्त मंडळांना देण्यात येणाऱ्या मंडप बांधणी परवान्याला होणाऱ्या दिरंगाईमुळे मंडळांना मंडप बांधणी करण्यास अडचणी येत आहे. त्यातच अहिल्यानगर महापालिकेच्या ऑनलाईन परवान्याचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मंडळाला बांधकाम परवाना मिळाल्यानंतर काही तासातच पुन्हा मंडळाचा परवाना रद्द केल्याचे पत्र महापालिकेकडून आल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या माळीवाडा प्रभाग समिती कार्यालयामध्ये सावळ्या गोंधळाविरोधात अर्धनग्न आंदोलन केले.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक
परवानगीला अचानकपणे स्थगिती (AMC)
यावेळी ओंकार गिरवले यांनी आपण मंडळाचे अध्यक्ष आहोत मी रितसर ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केलेला होता व त्यानुसार मला परिसर परवानगी मिळालेली होती कैलास मोकाटे व मंदार मोकाटे यांनी सुद्धा याच नावाने अर्ज करून एक प्रकारे फसवणूक केलेली आहे. त्यांना सुद्धा परवानगी दिलेली नाही. परवानगी रितसर मला दिलेली असताना व मी या मंडळाचा अधिकृत अध्यक्ष आहे. आज अचानकपणे महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाने या परवानगीला स्थगिती असल्याचे सांगितले व आम्हाला या ठिकाणी मंडप उभारणी करण्यास मज्जाव केलेला आहे, ही बाब अतिशय निंदनीय आहे.
आम्ही या संदर्भामध्ये कोतवालीचे पोलीस निरीक्षक दराडे यांची सुद्धा भेट घेतली होती त्यांनी सुद्धा आम्हाला तुम्ही दोन दिवस थांबा असे सांगितले होते. आम्हाला परवानगी का नाकारली म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन आंदोलन केले व त्यानंतर आम्हाला प्रशासनाने उद्या या संदर्भात आयुक्तांच्या समवेत बैठक घेऊन या विषयावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले पण दुसरीकडे आता गणपती आणि दोन दिवस राहिले असताना आम्हाला अशा पद्धतीने परवानगी नाकारलेली आहे. ही बाब योग्य नाही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत आहे मानाच्या ११ गणपती मध्ये आमच्या गणपतीचा समावेश आहे मी एवढे होऊन देखील सुद्धा प्रशासनाने अशा पद्धतीने का निर्णय घेतला हे सुद्धा आम्हाला कळू शकलेले नाही असेही गिरवले यांनी सांगितले.
दरम्यान या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर प्रभाग समिती चे प्रमुख कोतकर यांनी आयुक्त यांनी उद्या या संदर्भामध्ये बैठक बोलवली आहे व तेथे निर्णय घेतला जाईल असे सांगितल्यानंतर हे आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे.