Manoj Jarange:मोठी बातमी!मनोज जरांगेंना आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई

0
Manoj Jarange:मोठी बातमी!मनोज जरांगेंना आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई
Manoj Jarange:मोठी बातमी!मनोज जरांगेंना आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई

नगर : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे ते आंदोलन (Agitation) करणार आहेत. मात्र हे आंदोलन करण्यास त्यांना मुंबई हायकोर्टाकडून(Mumbai High Court) मनाई (Forbidden) करण्यात आली आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल,असे मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान निर्देश दिले आहेत. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ते आता काय  भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नक्की वाचा : तुळजाभवानीच्या पालखीसाठी २०० वर्ष जुना दांडा बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना  

‘मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा’ – मनोज जरांगे (Manoj Jarange)

मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं,अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही,अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ,असं जरांगेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. मात्र आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगे यावर काय तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.

अवश्य वाचा :  बाप्पाला घरी आणताना वस्त्राने झाकून का आणतात? वाचा सविस्तर…  

कसा आहे जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग? (Manoj Jarange)

मनोज जरांगे पाटील यांनी काल (ता. २५) पत्रकार परिषद घेत अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाण्याचा मार्ग सांगितला होता. “अंतरवाली सराटी येथून २७ ऑगस्टला निघून पुढे आम्ही छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे या मार्गे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमधून मुंबईतील आझाद मैदान इथं पोहोचणार आहोत. २७ ऑगस्टला रात्री आमचा मुक्काम किल्ले शिवनेरीवर असेल. शिवनेरी किल्ल्यावर माती कपाळी लावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला शिवनेरीहून मुंबईला निघू आणि आणि  सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचू,” असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं.