Fraud : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

Fraud : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

0
Fraud : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले
Fraud : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

Fraud : नगर : सोन्याचे दागिने (Gold Jewelry) पहिल्यापेक्षा जास्त चमकवून देतो, असे म्हणून दोन अनोळखी व्यक्तीनी एका ७८ वर्षीय वृध्द महिलेकडील सुमारे पाच तोळ्याचे दागिण्याची फसवणूक (Fraud) केल्याची घटना मंगळवारी (ता. २६) वसंत टेकडी, सावेडी येथे घडली. या प्रकरणी सुमन मानिक बैरागी (वय ७८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

फिर्यादीत म्हटले आहे की,

मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्या अंगणात कपडे वाळत घालत असताना दोन अनोळखी व्यक्ती घराच्या कंपाउंडमध्ये आले. त्यातील एकाने आम्ही भांड्याची पावडर विकायला आलो आहोत, याने भांडी चकाचक होतात असे सांगत त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्याने प्रथम घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करून दाखवले. त्यानंतर फिर्यादींच्या हातातील सोन्याच्या बांगडीवर पावडर घासून ती अधिक चमकदार झाली असल्याचे दाखवले. त्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादीने आपले हातातील, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून त्या इसमाकडे दिले. इसमाने त्यावर पावडर टाकून झाकण लावले व पाच मिनिटांनंतर उघडा, दागिने अधिक चमकतील असे सांगून डबा परत देत दोघेही पसार झाले.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Fraud)

तथापि, काही वेळाने डबा उघडून पाहिल्यावर त्यामध्ये कोणतेही दागिने आढळले नाहीत. त्यानंतर वृध्द दाम्पत्याने घरभर शोध घेतला पण दागिने मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना आपण फसवले गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या, चार ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप व दीड तोळ्याची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर अधिक तपास करीत आहेत.