Shirdi : नगर : शिर्डी (Shirdi) साईबाबा संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग (Free Parking) सुविधेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यास मोठा हातभार लागणार असून मंदिरासमोरील मार्ग भाविकांसाठी अधिक सोयीचा ठरेल, अशी अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत पार्किंगचा प्रारंभ
साईबाबा संस्थानतर्फे मध्यवर्ती भागात सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेचा औपचारिक प्रारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, विजय जगताप, रवींद्र गोंदकर, बाबासाहेब कोते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले
विखे पाटील म्हणाले, (Shirdi)
पार्किंगच्या सुविधेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेतली तर शहरात पार्किंगसाठी कुठेही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व वाहने व प्रवासी बस रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
पुढील काळात खासगी प्रवासी बससुद्धा या ठिकाणाहून सोडाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
या पार्किंग सुविधेमुळे मंदिर परिसर भविष्यात ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करता येईल. याचा थेट फायदा वाहतूक नियंत्रणासाठी होईलच, शिवाय शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.