MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला; संगमनेरमध्ये पुन्हा तणाव

MLA Amol Khatal

0
MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला; संगमनेरमध्ये पुन्हा तणाव
MLA Amol Khatal : आमदार अमोल खताळ यांच्यावर माथेफिरुचा हल्ला; संगमनेरमध्ये पुन्हा तणाव

MLA Amol Khatal : संगमनेर: मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय (Political) व सामाजिक वातावरण विविध कारणांनी ढवळून निघाले आहे. त्यातच काल सायंकाळी एका कार्यक्रमादरम्यान आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर एका माथेफिरुने हल्ला केल्याने संगमनेरमध्ये (Sangamaner) पुन्हा एकदा तणावातचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला.

नक्की वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

उपस्थितांनी माथेफिरूला दिला चोप

संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स याठिकाणी संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन व आरती झाल्यानंतर आमदार अमोल खताळ यांचे भाषण झाले व त्यानंतर ते परत निघताना प्रत्येकाशी हस्तांदोलन करत चालले असता, एका माथेफिरुने मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार खताळ यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला. उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

माथेफिरुला केले पोलिसांच्या स्वाधीन (MLA Amol Khatal)

यावेळी सोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने या माथेफिरुला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी खताळ यांचे समर्थक हजारोच्या संख्येने जमा झाले होते. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमदार खताळ पुन्हा घटनास्थळी आले. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी याठिकाणी थांबायचं नाही आणि कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही, असे आमदार खताळ यांनी सांगितल्यानंतर जमाव पांगला.

या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी संगमनेर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या कीर्तनात गोंधळ झाला होता. त्यानंतर भंडारे महाराजांच्या एका विधानानंतरही संगमनेरमध्ये मोर्चा निघाला होता. आता पुन्हा एकदा आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथेफिरुने हल्ला केल्याने संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.