Crime Filed : भिस्तबाग येथे प्लॉटवर ‘ताबा’, जीव घेण्याची धमकी; गुन्हा दाखल

Crime Filed : भिस्तबाग येथे प्लॉटवर 'ताबा', जीव घेण्याची धमकी; गुन्हा दाखल

0
Crime Filed : भिस्तबाग येथे प्लॉटवर 'ताबा', जीव घेण्याची धमकी; गुन्हा दाखल
Crime Filed : भिस्तबाग येथे प्लॉटवर 'ताबा', जीव घेण्याची धमकी; गुन्हा दाखल

Crime Filed : नगर : भिस्तबाग येथील प्लॉटवर काही जणांनी अतिक्रमण (Encroachment) करून प्लॉट मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अतुल पारख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली (Crime Filed) आहे. शहरातील व्यापारी अतुल अशोक पारख (वय ४९, रा. माणिकनगर, अहिल्यानगर) यांच्या मालकीच्या भिस्तबाग येथील प्लॉटवर काही जणांनी अतिक्रमण केले आहे.

नक्की वाचा :  जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?  

२०१६ रोजी विकत घेतली होती जमीन

पारख यांनी १५ जून २०१६ रोजी आबासाहेब बाबुराव बारस्कर (रा. बारस्करनगर, तपोवन रस्ता, भिस्तबाग) यांच्या मालकीची भिस्तबाग येथील सर्व्हे क्र. ३१ मधील ९६ गुंठे जमीन खरेदीखत अन्वये ४ कोटी ४० लाख रूपयांना विकत घेतली होती. संबंधित जमीन महसूल नोंदणीवर पारख यांच्या नावावर असून प्रत्यक्ष ताबाही त्यांच्याकडे आहे. जमिनीचे नॉन-ॲग्रीकल्चरल (एनए) रूपांतर करून त्यांनी त्याचे प्लॉट्स केले असून बहुतेक प्लॉट विकले आहेत.

अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले

काही जणांकडून पत्र्याचे शेड ठोकून ताबा घेण्याचा प्रयत्न (Crime Filed)

२७ ऑगस्ट रोजी पहाटे पारख यांचे ओळखीच्या व्यक्तीने त्यांना पहाटे ५ वाजता फोन करून माहिती दिली की, भिस्तबाग येथील प्लॉट क्र. ३ वर काही जणांनी पत्र्याचे शेड ठोकून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पारख व त्यांचा मावस भाऊ प्रमोद गोकरिया घटनास्थळी पोहोचले असता, गोकुळ आठरे, आबासाहेब बारस्कर, ॲड. अनिल माने (पूर्ण पत्ता माहिती नाही) तसेच इतर २ ते ३ अनोळखी इसम यांनी शेड उभारून ५-६ गायी आणून बांधलेल्या होत्या. पारख यांनी विरोध केल्यावर गोकुळ आठरे याने तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा तो करा, मध्ये आलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.