Nilesh Lanke : ‘त्या’ घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करा; खासदार लंके यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Nilesh Lanke : 'त्या' घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करा; खासदार लंके यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
Nilesh Lanke : 'त्या' घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करा; खासदार लंके यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Nilesh Lanke : 'त्या' घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करा; खासदार लंके यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरातील सय्यद घोडे पीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर काही अज्ञात दंगेखोरांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी ही घटना आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाई (Action) करावी, अशी मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा: सर्व मागण्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

पोलीस अधीक्षकांची भेट घेत दिले निवेदन

नगर शहरात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभुमीवर खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अथर खान, प्रा. सीताराम काकडे, नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आवश्य वाचा : गणेशोत्सवात नागरिकांच्या मदतीसाठी ‘पोलीस मित्र’

खासदार लंके म्हणाले, (Nilesh Lanke)

शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेले सय्यद घोडे पीर दर्गा हे धार्मिक स्थळ हे दोनही समाजांचे सामूहिक श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी झालेल्या तोडफोडीला शहरातील समाज घटकांनी दुर्देवी म्हटले असून ही कृती काही असामाजिक प्रवृत्तींचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने काही संशयितांना ताब्यात घेले आहे, मात्र, चौकशी वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.