Local Crime Branch : नगर : ओडिशा राज्यातून विक्रीसाठी आणलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने शेंडी बायपास, वडगाव गुप्ता परिसरातून ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा (Cannabis) असा एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.
नक्की वाचा: सर्व मागण्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे
नवनाथ अंबादास मेटे (वय ३८, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय ३१, रा. मळेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबिनवर टपावर ६ गोण्यामध्ये ३० लाख २२ हजार ६२५ रुपये किमतीचा १२० किलो ९०५ ग्रॅम गांजासह एकूण ८० लाख ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आवश्य वाचा : गणेशोत्सवात नागरिकांच्या मदतीसाठी ‘पोलीस मित्र’
सापळा रचून आरोपी घेतले ताब्यात (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार ओडिसी येथून गांजाची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आत्तार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांच्या पथकाने केली.