Football Tournament : फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले

Football Tournament : फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले

0
Football Tournament : फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले
Football Tournament : फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ संघ भिडले

Football Tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football Tournament) मंगळवारी (ता. २) झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांनी आक्रमक खेळी करुन १६, १४ वर्षा आतील गटात विजय संपादन केले. तसेच १२ वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल, १४ वर्ष वयोगटात पोदार स्कूल व ऑर्चिड स्कूल आणि १६ वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूलच्या संघाने दमदार खेळी करुन विजय मिळवला. अहमदनगर महाविद्यालयाच्या (Ahmednagar College) मैदानावर तुल्यबळ असलेले संघ भिडले होते.

नक्की वाचा: साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

४-० गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा विजय

सकाळच्या सत्रात १६ वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळी करुन ४ गोल केले. यामध्ये विरेंद्र वीर, डी. आदर्श, वैभव गाडे व कार्तिकेश यांनी प्रत्येकी एक गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. ४-० गोलने आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला.

अवश्य वाचा : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल

शेवट पर्यंत अटीतटीचा सामना (Football Tournament)

१२ वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलला पराभवाचा सामना पत्कारावा लागला. समोर तुल्यबळ आठरे पाटील स्कूलचे संघ होते. शेवट पर्यंत हा सामना अटीतटीचा राहिला. सात्विक कर्पे याने १ गोल करुन ०-१ ने आठरे पाटील स्कूल संघाला विजय मिळवून दिला. दुपारच्या सत्रात १४ वर्ष वयोगटात (मुले) नालंदा स्कूल विरुध्द पोदार स्कूलमध्ये रंगतदार सामना पहावयास मिळाला. यामध्ये सन्मित्र गवळी याने पोदार स्कूलकडून १ गोल करुन ०-१ गोलने आपल्या संघास विजय मिळवून दिला. ऑर्चिड स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात ऑर्चिड स्कूलने १-० गोलने विजय मिळवला. यामध्ये ऑर्चिड स्कूलचा खेळाडू भावेश गडाख याने १ गोल केला होता.


आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द पीएम श्री केव्ही स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात सुरज येवले याने १ गोल करुन १-० गोलने आर्मी पब्लिक स्कूलला विजय मिळवून दिला. १६ वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूलच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलवर एका पाठोपाठ ६ गोल केले. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. ०-६ गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला. यामध्ये आठरे पाटील कडून ओम लोखंडे याने २, भानुदास चंद १ तर अशोक चंद याने ३ गोल केले.