Shardiya Navratri : पाथर्डी: राज्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाणारी मोहटा येथील शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratri) यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्हाधिकारी पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी मोहटादेवी गडावर (MOHATA DEVI) येऊन विविध कामांची पाहणी केली. यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी घाट रस्ता, पाणी, वीजपुरवठा, दळणवळण सुविधा व अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
नक्की वाचा: साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
आशिया यांनी केली देवीची महापूजा
जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गडावर दाखल झालेल्या आशिया यांनी देवीची महापूजा केली. विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख, देवस्थान समितीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी स्वागत करून यात्रेसंबंधी माहिती दिली. यावेळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल कांबळे, तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे उपस्थित होते.
अवश्य वाचा : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल
अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे स्पष्ट निर्देश (Shardiya Navratri)
यात्रेपूर्वी घाट रस्त्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण व्हावे आणि पायी चालत येणाऱ्या तसेच वाहनाने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासनाला दिले. वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींवरून वीज वितरण कंपनीला अहोरात्र अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. नवरात्र कालावधीत मोहटादेवी गडावर लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे भाविक हाच केंद्रबिंदू मानून सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कामे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यात्रेपूर्वी पुन्हा एकदा पूर्वतयारीची पाहणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.