Chess : नगर : अहिल्या नगर (Ahilyanagar) जिल्हा बुद्धिबळ (Chess) संघटनेमार्फत १९ वर्षांच्या खालील खेळाडूं म्हणजे १/१/२००६ नंतर जन्मलेले नगर जिल्ह्यातील खेळाडू साठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) आयोजित केली आहे.
नक्की वाचा :मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?
राज्य स्पर्धेसाठी मुलांचा व मुलींचा संघ निवडणार
नगर येथील गायत्री मंगल कार्यालय, महाजन गल्ली, नगर. येथे सदरील स्पर्धेचे नियोजन केले असून रविवार दि ०७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्पर्ध साठी अहिल्या नगर जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे ४ मुले व ४मुली, म्हणजेच प्रथम ४/४ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. अहिल्या नगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी, रू १०००/- संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल. पहिल्या पाच खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
सर्व खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार (Chess)
सदरील स्पर्धा ९,११,१४,१७ व १९ वर्षा खालील मुले व मुली खेळाडूं साठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा नुकताच क्रीडा सप्ताह झाला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुरांगे साहेब व श्री. विशाल गर्जे साहेब यांनी असे जाहीर केले आहे की U९, U११, U१४, U१७ U१९ या ग्रुप मधील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच 19 वर्षाखालील गटात पहिल्या पाच खेळाडुंना जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने आकर्षक ट्राॅफी देण्यात येईल. हे खेळाडू अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत करतील.
प्रवेश ऑनलाईन किंवा व्हॉट्सअँप वर स्वीकारले जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहिल्या नगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष श्री नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
खालील गुगल फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करा…
https://forms.gle/3tE1C8M1rj6PmRJGA
१९ वर्षांखालील विजेत्या पाच मुली व पाच मुले यांना ट्रॉफी
९,११,१४,१७ वर्षांखालील विजेत्या मुला मुलींना ५ मेडल्स
सदर निवड चाचणी स्पर्धेतील प्रवेश नोंदणी करता व अधिक माहितीकरिता:-
१) श्री. यशवंत बापट सर – ९३२६०९२५०१
२) श्री. पारूनाथ ढोकळे सर – ९८५०७०४२६८
३) देवेंद्र ढोकळे – ८६००४१२६३३
४) प्रशांत धंगेकर – ९९२१३७७९८८
५) मनीष जस्वानी – ८८५५००२३३२
६) सनी गुगळे – ८८८४४५५३३५
या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.