National Health Mission : अहिल्यानगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (Contractual Medical Officer) व कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाच्या १७व्या दिवशी आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सी.टू) (Centre of Indian Trade Union) अहिल्यानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांना जाहीर पाठिंबा दिला.
नक्की वाचा : मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?
यांची उपस्थिती
यावेळी कॉम्रेड प्रवीण सोनवणे, कॉम्रेड संदिप सकट, कॉम्रेड सोमनाथ केंजळे, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद यांच्यासह सत्यशोधक बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सुनील ढोले, शहर सचिव योगेश साबळे आणि जालू शेलार उपस्थित होते.
अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
कॉ. प्रविण सोनवणे म्हणाले, (National Health Mission)
आंदोलकांशी संवाद साधताना कॉ. प्रविण सोनवणे म्हणाले, “या आंदोलनाला १७ दिवस उलटूनही शासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. उलट रुग्णसेवेत खंड पडून गरीब रुग्णांना आणि आत्ता कामावर येणाऱ्या अत्यल्प कर्मचारी वर्गाला वेठीस धरले जात आहे. हे अन्यायकारक असून शासनाच्या या असंवेदनशीलतेचा आम्ही जाहीर निषेध करतो.”
दि. १४ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार सेवेत समायोजनाची अंमलबजावणी त्वरित करावी, तसेच आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी कॉम्रेड प्रवीण सोनवणे,कॉम्रेड संदीप सकट,सुनील ढोले, जालू शेलार आणि योगेश साबळे यांनी कामगार लढ्याविषयी स्फूर्तीगीते सादर करून आंदोलकांचा आणखीच जोश वाढवला.आंदोलनकर्त्यांच्या वतीने विजय गायकवाड, उदय देशपांडे, सतीश आहिरे, डॉ. सूर्यकांत यादव, भक्ती पाखरे, सीमा आंधळे आणि नर्सिंग स्टाफ यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.