Vijaysinh Pandit:”लक्ष्मण हाके बाजारु श्वान,त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय”-विजयसिंह पंडित

0
Vijaysinh Pandit:
Vijaysinh Pandit:"लक्ष्मण हाके बाजारु श्वान,त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय"-विजयसिंह पंडित

Vijaysinh Pandit : लक्ष्मण हाके (Lakshman Hake) हा बाजारु श्वान, मोकाट कुत्रा आहे. त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी केली. माझ्या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी मी त्यांचे स्वागत करतो असेही ते म्हणाले. लक्ष्मण हाके ही अपप्रवृत्ती आहे. मी कोणत्याही समाज घटकाच्या विरोधात नाही.

ॲक्शनला रिएक्शन ही प्रवृत्तीच्या विरोधात झाली. हे महाशय समाजाचे प्रश्न घेऊन माझ्या भागात आले असते तर आम्ही किंवा जनतेने स्वागतच केले असते. मात्र वेळोवेळी यायचं आणि दंड थोपटायचे आणि संविधानाला मानणारा असं म्हणायचं. एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याच प्रवृत्तीला माझा विरोध असल्याचे पंडीत म्हणाले.

नक्की वाचा : कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ;आता ९ नव्हे तर १२ तासांची ड्युटी

“लक्ष्मण हाके कुणाची तरी सुपारी घेऊन येतात ” (Vijaysinh Pandit)

मला एका समाजाने विधानसभेत पाठवलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांना समाजातील  एक घटक म्हणून पाठिंबा दिला असल्याचे आमदार विजयसिंह पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके कुणाची तरी सुपारी घेऊन येतात. प्रीपेड वाऊचर प्रमाणे रिचार्ज होतात. लक्ष्मण हाके यांचे रिचार्ज एक वर्षाचे मोठा डेटा प्रमाणे केले आहे. ज्यांनी हे रिचार्ज केले त्याचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे,असं पंडीत म्हणाले.

अवश्य वाचा :  चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

“लक्ष्मण हाके हा विषय माझ्यासाठी संपलेला” (Vijaysinh Pandit)

मराठा आरक्षणावर राज्य सरकारने सुवर्णमध्य काढला आहे. कोणत्याही समाज घटकाला यामुळं अडचण येणार नाही,असे विजयसिंह पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. आता ॲक्शन झाली तर त्याला रिएक्शन मी देणार नाही, माझ्या भागातील सुज्ञ जनता देईल असं पंडित म्हणाले. लक्ष्मण हाकेंच समाजात तेढ निर्माण करण्याचं काम चालूच  राहणार असल्याचे पंडित म्हणाले.