Ahilyanagar News:ऐकावे ते नवलच!आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून

0
Ahilyanagar News:ऐकावे ते नवलच!आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
Ahilyanagar News:ऐकावे ते नवलच!आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून

नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरातील कचरा (Garbage) ही दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चालला आहे. त्यात महापालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा घरातच साचून राहतो. आता हा कचरा कुणी टाकायचा, यावरून कुटुंबात देखील वाद (Argument) होऊ लागलेत. अशीच एक घटनाही समोर आली आहे. आई दररोज कचरा टाकायला सांगत असल्याच्या रागातून आई व मुलामध्ये भांडण झाले व मुलगा घरातून निघून गेला. त्याला पोलिसांनी शोधून काढले आहे.मात्र त्याने आई- वडिलांसोबत न जाण्याचा हट्ट धरला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने तो आई-वडिलांसोबत जाण्यास तयार झाला. मात्र मुलाच्या तक्रारीमुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.

नक्की वाचा : नर्तकीच्या प्रेमाखातर बीडमधील उपसरपंचाने केली आत्महत्या  

अखेर पोलिसांनीच मुलाला शोधले (Ahilyanagar News)

आईसोबत भांडण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून मुलगा बेपत्ता होता.आई-वडिलांनी आजूबाजूला खूप शोध घेतला.परंतु,तो काही सापडला नाही. त्यामुळे आई-वडील पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.त्यानंतर वडिलांनी तो शिकत असलेल्या शाळेतही चौकशी केली. परंतु, तो तिथेही नव्हता. दोन दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकाला हा मुलगा दिसला. त्याने मुलाच्या आई-वडिलांना कळविले. पालकांनी पोलिसांना कळवताच पोलिसांनी मुलाला शोधले.

अवश्य वाचा :  मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका

आई कचरा टाकायला सांगते म्हणून मुलाचा आईसोबत वाद (Ahilyanagar News)

मुलाकडे विचारणा केली असता त्याने आईसोबत भांडण झाल्याचे सांगितले. आई त्रास देते. मला तिच्यासोबत जायचे नाही. मी काकांसोबतच राहणार आहे, असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. मात्र,मुलगा आई-वडिलांसोबत जायला तयार होईना. पोलिसांनी भांडणाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आई कचरा टाकायला सांगते म्हणून त्यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे.