Beating : नगर : पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मिरी येथे पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण (Beating) केल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) सक्त मजुरीची शिक्षा आज (ता. ११) सुनावली. गणेश जनार्दन कोरडे व अमोल राजेंद्र सोनवणे (रा. मिरी, ता. पाथर्डी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
पूर्ववैमनस्यातून लोखंडी गज व पाईपने मारहाण
मिरी येथे आदेश औताडे याला १२ जून २०१८ रोजी पूर्ववैमनस्यातून गणेश कोरडे व अमोल सोनवणे यांनी लोखंडी गज व पाईपने मारहाण करून तिसगाव फाट्याजवळ टाकून दिले होते. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवगाव व पाथर्डी पोलिसांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता चंद्रशेखर कुलकर्णी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यात डॉ. विद्या शिंगाडे व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’
तीन वर्षांची सक्त मजुरी व 3 हजारांचा शिक्षा (Beating)
या प्रकरणात साक्षी पुराव्यावरून आरोपींनी आदेश औताडेला मारहाण करून जखमी केल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपींना तीन वर्षांची सक्त मजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.