Crime Registered : अकोले: आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे (Raghoji Bhangre) यांच्या अर्धाकृती पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार देवगाव (ता.अकोले) येथे उघडकीस आला असून सदर दोन ठेकेदारांविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात (Rajur Police Station) गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा: आईने कचरा टाकायला सांगितल्याने मुलगा गेला घर सोडून
परवानगी न घेता काढला पुतळा
आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असून ठेकेदाराकडून झालेल्या प्रकाराबद्दल आदिवासी बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे. सध्या देवगाव येथील स्मारकाच्या परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यावेळी सदर काम करणारे ठेकेदार शैलेश गणपत पांडे (रा.अकोले) व अजित बाळू नवले (रा. पाडाळणे) यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा पुतळा हा बाजूला काढून ठेवला आहे.
अवश्य वाचा: १२७ कोटीची कामे अहिल्यानगर महापालिका करतेय उध्वस्त’
ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी (Crime Registered)
सदर प्रकार हा पोपट काळू चौधरी या युवकाच्या लक्षात आला. त्यानंतर देवगाव येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज जमा होण्यास सुरुवात होऊन नंतर हा जमाव राजूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी अमित भांगरे, दिलीप भांगरे, देवगावच्या सरपंच तुळसाबाई भांगरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, पंढरीनाथ खाडे यांच्यासह जमलेल्या आदिवासी बांधवांनी सदर प्रकार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोपट चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार शैलेश पांडे व अजित नवले यांच्याविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहे.