Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड

Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड

0
Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड
Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड

Gemini AI : कर्जत : सध्या सोशल मीडियावर जेमिनी एआय (Gemini AI) ट्रेंडने चांगलाच धुमाकूळ घातला असून राजकीय (Political) व्यक्तिमत्वापासून ते तरुणाई यासह सर्वसामान्य या ट्रेंडला भुलले आहेत. आपले जुने-नवीन फोटो एआय तंत्रज्ञानाने अत्याधुनिक रूप देत ते सोशल मीडियावर (Social Media) स्टेटस ठेवत त्यावर मित्र कंपनीची प्रतिक्रिया मिळवत आहेत. यात महिला-तरुणी देखील अग्रेसर असून हा नवीन एआय ट्रेंड (AI Trends) व्हायरल होत आहे.

अवश्य वाचा: देवगाव येथे पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना; दोघांवर गुन्हा दाखल

जीपीटी इमेज, एआय ट्रेंड फोटोची चलती

सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वच क्षेत्रातील नामवंत तसेच तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात करीत आहे. स्मार्टफोन आल्यापासून तासनतास त्यावर रिल्स, तसेच व्यावसायिक वापर देखील करण्यात येत आहे. सोशल मीडियावर आपला प्रोफाइल फोटो, डीपी, कोट्स चांगला आणि इतरांसाठी आकर्षक असावा याकरीता सर्वच तत्पर असतात. आपल्या भावना, संदेश, काही महत्वाच्या अपडेट्स या माध्यमातून देण्यात येते. अलीकडील काळात सर्वच सोशल मीडियावर जीपीटी इमेज, एआय ट्रेंड फोटोची चलती झाली आहे. यात अल्पावधीतच त्याची भुरळ केवळ तरुणाईवर न पडता राजकीय व्यक्तीमत्व आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील पडली आहे.

Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड
Gemini AI : जेमिनी एआयची सोशल युजर्सना भुरळ; राजकीय दिग्गजांसह सर्वसामान्यांना नव्या अवताराचे वेड

नक्की वाचा: जिल्ह्यात ११ ते १५ सप्टेंबर कालावधीसाठी हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे आवाहन

नवीन एआय अवतार मांडत आहे जगासमोर (Gemini AI)

जुन्या संग्रहातील फोटो म्हणा किंवा नुकताच फिल्टर वापरून काढलेले फोटो जीपीटी किंवा जेमिनी ट्रेडवर आकर्षक स्वरूपात अवघ्या काही सेकंदातच नेटवर युजर्सना उपलब्ध करून देत आहे. या ट्रेंडने चांगले-चांगले लोक झपाटलेली गेली असून आपले एआय फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा सपाटा लावला आहे. आपल्या सोशल अकाऊंटवरून अनेक राजकीय दिग्गज गोइंग विथ ट्रेंड या टॅगलाईनने आपला नवीन एआय अवतार जगासमोर मांडत आहे. चाट जीपीटी किंवा एआय ट्रेड सर्वांनाच जमेल असे नाही. ज्यांनी आपले एआय फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यांचे फोटो पाहून आपला पण फोटो या अवतारात असावा, अशी प्रत्येकाला भुरळ पडत आहे. ज्यांना यात सहज जमते त्यांना त्यांचा मित्रपरिवार आपला फोटो पण या नवीन ट्रेंडमध्ये मिळावा म्हणून साद घालत आहे. अवघ्या दोनच दिवसांत या एआयने सर्वानाच वेड लावले आहे.