Dr. Sarjerao Nimse : नगर : नॅक कमिटी मध्ये मी बऱ्याचदा शाळा महाविद्यालयांचे परीक्षण केले. पण यात आता बऱ्याच वाईट गोष्टींचा शिरकाव झाल्याने मी ते काम बंद केले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या (Educational Policy) हेतूची खरी अमलबजावणी कशी होते यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. भारतीय भाषांवर (Indian Languages) प्रभुत्व असणे आवश्यकच आहे. त्रीभाषांचा गोंधळ जाणूनबुजून घडवून आणला जात आहे. भाषांच्या अमलबजावणीसाठी दोन गट भांडत आहेत हे खेद जनक आहे. आता ५० टक्के विद्याथी इंग्रजी भाषेतून (English Language) शिक्षण घेत असल्याने त्यांना आपली भाषा, संकृती व सभ्यता यांचे ज्ञान नाहीये. यासाठी पाठ्यपुस्तकात स्थूल स्वरूपाच्या अभ्यासक्रमाचा समावेश असणे आवश्यक आहे. नव्या शैक्षणिक धोरणाला केवळ नावे ठेऊन चालणार नाही तर बौद्धीकतेने ते अभ्यासले पाहिजे, असे विचार माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे (Dr. Sarjerao Nimse) यांनी मांडले.
अवश्य वाचा: देवगाव येथे पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना; दोघांवर गुन्हा दाखल
‘बदलती शिक्षण व्यवस्था मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद
नगरमध्ये झालेल्या युवा साहित्य व नाट्य संमेलनात शुक्रवारी ‘बदलती शिक्षण व्यवस्था आणि मराठी साहित्य’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या चर्चेत माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली नगर कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुधाकर शेलार, न्यू आर्टस् महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मीकांत येळवंडे व राष्ट्रीय साहित्य पुरस्कार विजेत्या देवकी ढोकणे यांनी सहभाग घेतला. पत्रकार सुधीर लंके सूत्रसंचालन केले.
नक्की वाचा: जिल्ह्यात ११ ते १५ सप्टेंबर कालावधीसाठी हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे आवाहन
प्रा. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी सांगितले की, (Dr. Sarjerao Nimse)
जुन्या काळातील शिक्षण महर्षींनी जी काही व्यवस्था केली होतो त्याने झपाटलेपण आले होते. त्यास आता ओहटी लागली आहे. शिक्षण घेऊनही याचा काही उपयोग आहे अशी वातरी पिढी एका बाजूल आहे तर दुसऱ्या बाजूला शाळा महाविद्यालयांचे ओस पडणारे वर्ग असे भयंकर चित्र दिसत आहे. शिक्षणाचा मुल हेतू नष्ट होत आहे. हा नर्माण झालेला गोंधळ संपवण्यासाठी पूर्वीची पद्धती माध्यमे बदलने आवश्यक आहेत. एकूणच या व्यवस्थेत बदल करणात सर्जनशील आली पाहिजे. नुसत्या पदव्या नको तर परिपूर्ण अभ्यासक्रम असला पाहिजे.समाजाचा व विद्यार्थ्यांचा विकास करणारे अभ्यासक्रम आले पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण शासन राबवत आहे पण ते अद्याप खालपर्यंत पोहचलेले नाहीये.
डॉ.सुधाकर शेलार म्हणाले, शेतकऱ्याची मुले जेव्हा राज्यकर्ते होतील तेव्हाच राज्याचा कारभार व्यवस्थित चालेल, असे म्हटले जाते. पण सातत्याने राज्यकर्ते व धोरण ठरवणारे आहेत ते शेतकऱ्याचेच मुले आहेत. त्यांचे निर्णय व धोरण कितपत योग्य आहेत? सरकारकडे लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत पण शिक्षक नेमण्यासाठी नाहीत हे दुर्दैव. राज्यात नवे धोरण जाहीर केले आहे मात्र त्यासाठी निधीच देत नाही मग कसं काय शिक्षण विस्तार व विकास होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून विज्ञानवाद साहित्यातून आला पाहजे व रुजवला गेला पाहिजे. नव्या राष्ट्रीय धोरणानुसार भारतीय ज्ञान परंपरा विधार्थ्याना शिकवायची आहे. यातील चांगले पैलू नक्कीच अभ्यासक्रमात आली पाहिजे. पण ब्रिटिशांकडून आपल्याकडे आलेली परंपरा नाकारून प्रवाह उलटा करणे चुकीचे आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेत साहित्याचा महत्वाचा भाग असला पाहिजे. योग्य पद्धतीने जर साहित्यांचा सहभाग अभ्यासक्रमात झाला तर याचा चांगला परिणाम होऊ शकतो.
देवकी ढोकणे म्हणाल्या, गुरुकुल शिक्षण पद्धती ते ऑनलाइन शिक्षण पद्धती सर्वांनीच पाहिली. आता एआय तंत्रज्ञान आले आहे. तेच सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने शिक्षण घेता येत आहे. मात्र जे ज्ञान शिक्षक देऊ शकते ते मोबाईल किंवा इतर इतर तंत्रज्ञान देऊ शकत नाही. म्हणून शिक्षकां शिवाय पर्याय नाही. शिक्षक हाच शिक्षणाचा गाभा आहे. या पुढील काळात विद्यार्थ्यांना शिकवताना साहित्य कृतीने व नव्या रूपाने शिकवले गेले पाहिजे. काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजे, असे सांगितले.