Kiran Lahamte : अकोले : एखाद्या गावचा जागरूक सरपंच आमदारापेक्षा (MLA) अधिक चांगला गावचा विकास करू शकतो, इतके अधिकार व निधी पंचायत राजच्या माध्यमातून गावाला मिळत आहे. नुसती खुर्ची उबवण्यासाठी नको, तर गावाच्या विकासासाठी सरपंच (Sarpanch), उपसरपंच, पदाधिकारी व्हा, असा सल्ला आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी दिला.
अवश्य वाचा: देवगाव येथे पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना; दोघांवर गुन्हा दाखल
तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन
जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती कृषी अधिकारी विकास चौरे, महिला बालकल्याण प्रकल्प प्रभारी अधिकारी अर्चना एखंडे व शैला गवारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता व्ही. आर. पवार, जलसंपदा उपअभियंता मनीषा कांडेकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता सुंदर घुगे, अक्षय आभाळे, नीता आवारी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: जिल्ह्यात ११ ते १५ सप्टेंबर कालावधीसाठी हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे आवाहन
आमदार लहामटे म्हणाले, (Kiran Lahamte)
तालुक्यात रानभाज्या, वनरानातील रानमेवा, फळे भरपूर आहेत. त्याला बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्नशील आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावचा विकास साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी मोरे व चौरे यांनी करत विविध योजनांची माहिती दिली. महसूल विभागाच्या योजनांची माहिती देत, पाणंद रस्ते मोकळे करून घेण्यासाठी जागरूक व्हा, असे आवाहन तहसीलदार मोरे यांनी केले. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पोषण महाअभियानचे उद्घाटन यावेळी झाले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही कार्यशाळेला भेट दिली. ग्रामविकासाच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून गावात आणता येतात. जलजीवनच्या योजना चांगल्या राबवून घ्या, सौरऊर्जा प्रकल्प राबवा, असे खासदार वाकचौरे म्हणाले.