Nilesh Lanke : पारनेर: आगामी जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हंगा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आक्रमक भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीतील (Assembly Elections) अनुभव, ईव्हीएम वाद, गद्दारीचा मुद्दा आणि महायुती सरकारवर हल्लाबोल अशा अनेक मुद्दयांवर त्यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
अवश्य वाचा: देवगाव येथे पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना; दोघांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित
यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, शिवाजीराव जाधव, विकास रोहोकले, अशोक रोहोकले, ॲड. राहुल झावरे, सचिन पठारे, बाळासाहेब खिलारी, रवींद्र राजदेव, प्रकाश गाजरे, जितेश सरडे, शिवाजी होळकर, गणेश साठे, अजय लामखडे, बाबासाहेब काळे, पोपटराव पुंड, पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, राजू शेख, योगेश मते, बाळासाहेब नगरे, सुभाष शिंदे, भुषण शेलार, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, सचिन पठारे, दादा शेटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा: जिल्ह्यात ११ ते १५ सप्टेंबर कालावधीसाठी हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे आवाहन
फाजील आत्मविश्वास नको (Nilesh Lanke)
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण ताकदीने लढवणार आहोत, आणि जिंकणारही आहोत. असे सुरूवातीला ठाम शब्दात खासदार लंके म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत सांगितले की आपला विजय निश्चित असला तरी फाजील आत्मविश्वास नको. प्रत्येक मतदारापर्यंत संघटित पध्दतीने पोहचा. प्रत्येक बूथ मजबूत करा. कारण मतदार हाच आपला खरा किल्ला आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपलीच ताकद पुरेशी असल्याचे ते म्हणाले. पारनेर-नगर मतदारसंघातील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्कासाठी लंके यांनी दर सोमवारी पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात दिवसभर उपस्थित राहून जनता दरबार भरवणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ तोडगा काढू, असे त्यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. खासदार लंके यांनी राज्यातील महायुती सरकारवर कडाडून टीका केली. महायुती सरकारवर जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या सभांना लोक येत नाहीत. दुसरीकडे आपल्या एका मेसेजवर हजारो कार्यकर्ते जमतात, आणि बसायलाही जागा उरत नाही. हीच आपली खरी ताकद, हीच आपली संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.