Prajakt Tanpure : नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन 

Prajakt Tanpure : नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन 

0

Prajakt Tanpure : राहुरी : येथील सेवानिवृत्त कृषी सहाय्यक शशिकांत तुकाराम दुधाडे महाराज यांचे शनिशिंगणापूर फाटा येथे आज (ता.१२) सकाळी अपघाती निधन (Accidental Death) झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीतील नागरिकांनी नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) आज सकाळी दहा वाजता तीव्र ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure), युवा नेते हर्ष तनपुरे, चाचा तनपुरे, देवेंद्र लांबे, रवींद्र मोरे, ज्ञानेश्वर जगधने, नीलेश जगधने आदींनी केले.

अवश्य वाचा: देवगाव येथे पुतळ्याची ठेकेदाराकडून अवहेलना; दोघांवर गुन्हा दाखल

दोन वर्षात ४०० पेक्षाही अधिक बळी

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, या नवीन ठेकेदाराविषयी आमच्या कोणाच्या काहीही तक्रारी नाहीत. मात्र, याआधी या महामार्गावर झालेल्या कोट्यावधी रुपये खर्चाच्या कामाची जबाबदारी निश्चित केली जावी. ते काम नीट न झाल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले व त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. शेकडो लोकांचे बळी गेलेले आहेत. दोन वर्षात ४०० पेक्षाही अधिक बळी राहुरी तालुक्याच्या हद्दीत झाले आहेत. प्रत्यक्षात पूर्ण महामार्गावर ही संख्या कितीतरी जास्त असू शकते. सातत्याने मागणी होऊनही हा रस्ता चांगला होत नाही. उलटपक्षी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे दाखल होतात. ते मागे घेण्यात यावेत. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जावी, अशा जोरदार मागण्या आंदोलकांनी केल्या.

Prajakt Tanpure : नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन 
Prajakt Tanpure : नगर-मनमाड रस्त्यावर पुन्हा अपघात; नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे रास्ता रोको आंदोलन 

नक्की वाचा: जिल्ह्यात ११ ते १५ सप्टेंबर कालावधीसाठी हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे आवाहन

रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा आंदोलकांनी दिला इशारा (Prajakt Tanpure)

माजी खासदार प्रसाद तनपुरे हेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. रवींद्र मोरे, कांता तनपुरे, ज्ञानेश्वर जगधने, निलेश जगधने, गेणूभाऊ तोडमल, विक्रम गाढे, देवेंद्र लांबे,अनिल येवले आदींची यावेळी भाषणे झाली. डीवायएसपी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आंदोलकांशी मागण्याबाबत चर्चा करत होते. मात्र, आंदोलक कोणत्या परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मृतदेह रस्त्यावरच ठेवून रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे सांगितले गेल्यावर आंदोलकांची मागणीचा रोख बदलला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी मुंबई व गोहाटी येथील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधल्यानंतर त्यांनी गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती . शशिकांत दुधाडे यांच्या कुटुंबातील सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. शशिकांत दुधाडे यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका आंदोलनाच्या ठिकाणी उभी होती. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका हलविली जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली होती. आश्वासन लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका जाऊ देण्यात आली. आंदोलनाच्याच काळात एक रुग्णवाहिका आल्याने तिला मात्र आंदोलकांनी तातडीने रस्ता करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here