छाननीनंतर सुनावणीसाठी तारीख जाहीर करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
AMC : नगर : राज्य शासनाच्या (State Government) आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या (General Election) पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून महानगरपालिकेने (AMC) हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) मान्यतेनुसार ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला होता. या आराखड्यावर मुदतीमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ४० हरकती दाखल झाल्या आहेत. एक हरकत वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. अनेकांची एकच हरकत वेगवेगळ्या नावाने दाखल असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी दिली.
नक्की वाचा : मोहटादेवी गडावर नवरात्रात पोलीस बंदोबस्तात वाढ; सोमनाथ घार्गे यांचे आश्वासन
राज्य निवडणूक आयोगाची मान्यता
नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नकाशासह प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यात आलेली आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर ४० हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग सहामध्ये इच्छुक उमेदवार लागले तयारीला
सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ जाहीर करणार (AMC)
काही अर्जांमध्ये एकसारखी व एकच हरकत असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. तर, एक हरकत ईमेल द्वारे वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. या सर्व अर्जांची छाननी करून सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ निश्चित करून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.