Radhakrishna Vikhe Patil : नगर : अतिवृष्टीने (Heavy Rain) निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात (Natural Disaster) नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिल्या.
अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता
नागरिकांची काळजी घेण्याच्या प्रशासनाला सूचना
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरिकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश मंत्री विखे यांंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
नक्की वाचा: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मुदतीत ४० हरकती दाखल
शासन स्तरावर मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य (Radhakrishna Vikhe Patil)
रविवारी (ता. १४) जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १९ महसूल मंडलातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील ३, पाथर्डी तालुक्यातील ३, श्रीगोंदा तालुक्यातील ८, कर्जत तालुक्यातील ५ मंडलाचा समावेश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पूर परिस्थिती ओसल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या १५लोकांची तसेच कासारपिंपळगाव येथील १६लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सर्व रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला या कुटंबातील ५व्यक्तिंना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाने नूकसान झालेल्या रहीवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून, पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अति पावसाचा दिलेला इशारा विचारात घेवून उपाय योजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.