BJP : कर्जत : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) यंदाच्या आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अहवालात विधान परिषदेचे (Legislative Council) सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचे छायाचित्र नसल्याने कर्जत तालुका भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी (ता.१५) कर्जतला तर मंगळवारी (ता.१६) माहिजळगावच्या जिल्हा बँकेच्या शाखेसमोर पदाधिकाऱ्यांनी बँकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. यावेळी बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता
अॅड. कैलास शेवाळे म्हणाले,
माहिजळगाव येथील निषेध आंदोलनात अॅड. कैलास शेवाळे म्हणाले, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत. जिल्हा बँकेने या भूमिपुत्राचा सन्मान करणे आवश्यक होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हा त्यांच्यासह त्यांच्या सर्वोच्च पदाचा अवमान आहे. त्यांचा फोटो न छापल्याने त्याचा कर्जत भाजप निषेध करीत आहे. सभापती राम शिंदे आमच्यासाठी फक्त नाव नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याचा अभिमान असल्याची भावना प्रत्येक वक्त्याने या जिल्हा बँकेच्या निषेध आंदोलनात मांडली.
नक्की वाचा: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मुदतीत ४० हरकती दाखल
लेखी स्वरूपात मागितली माफी (BJP)
सोमवारी कर्जतला स्थानिक भाजपने जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत सभापती राम शिंदे यांची माफी मागावी आणि झालेली चूक वार्षिक सर्वसाधारण सभेत सुधारून घ्यावी, असे बजावले. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या सत्तेत देखील भाजपचेच पदाधिकारी असून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. अखेर सदर प्रकरणाबाबत जिल्हा बँकेने आपली चूक मान्य करीत लेखी स्वरूपात याबाबत माफी मागितली. यासह वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याचे आश्वासन दिले.