Ahilyanagar News:अहिल्यानगर मध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं?

0
Ahilyanagar News:अहिल्यानगर मध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं?
Ahilyanagar News:अहिल्यानगर मध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं?

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या (Ahilynagar) कोठला परिसरात (Kothala Area) गोमांस (Beef) आढळले आणि मोठा गदारोळ झाला. मात्र, या परिसरात जनावरांचे मांस आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे का? येथेच मांसाचे तुकडे व अॅनिमल वेस्ट का आढळून येते? अहिल्यानगरमध्ये एकही कत्तलखाना (Slaughterhouse) अधिकृत नसताना असे प्रकार का घडतात?  असे अनेक प्रश्न आहेत. चला तर मग या घटनाक्रमा मागील कारणे जाणून घेऊ ?

नक्की वाचा : मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार  

कोठला परिसरात आढळले गोमांस (Ahilyanagar News)

कोठला परिसरात काल गोमांस आढळून येताच आमदार संग्राम जगताप व विक्रमसिंह पाचपुतेंसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास बंद पाडली. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत हे आंदोलन सोडवले. दोन दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी कोठला परिसरातील अॅनिमल वेस्ट संदर्भात वक्तव्य केले होते. मग प्रश्न उरतो हे अॅनिमल वेस्ट येते कोठून व का येते?

अवश्य वाचा : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल?

अहिल्यानगर शहरात कोठला परिसर हा शहर स्थापनेपासून अस्तित्वात आहे. हा भाग मुस्लिम बहुल संख्येचा आहे. त्यामुळे या परिसरात कत्तलखाने, चिकन शॉप, मच्छी बाजार देखील आहे. यातील चिकन शॉप व मच्छी बाजार यांना महापालिकेची परवानगी आहे. मात्र, शहरातील एकही कत्तलखाना अधिकृत नाही. त्यांची नोंद महापालिका प्रशासनाकडे नाही. असे असताना काही दिवसांपूर्वी महापालिकेने झेंडीगेट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती. या मोहिमेत महापालिकेच्या एका अस्थापनेला खेटून कत्तलखाना चालवला जात असल्याचे समोर आले.

अधिकृत नसलेला कत्तलखाना महापालिकेच्या अस्थापनेच्या भिंतीजवळ आला तरी महापालिकेला याची कल्पना का नसते ? शहरात असलेल्या कत्तलखान्यांतील रक्त महापालिकेच्या गटारीतून वाहत असल्याचे आरोप शहरात अनेक वेळा झाले. या कत्तलखान्यातील अॅनिमल वेस्ट महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या वाहनांनी उचलून नेले जात असल्याचाही आरोप होत असतो. तरीही काही कत्तलखाने, चिकन शॉप व मत्स्य व्यावसायिक अॅनिमल वेस्ट कोठला परिसरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर टाकतात. हे अॅनिमल वेस्ट शेवटी महापालिकेला उचलावे लागते,अशा अॅनिमल वेस्ट टाकणाऱ्यांवर महापालिका कारवाई का करत नाही? असाही प्रश्न आहे.

संग्राम जगताप यांनी विधानसभेत उठवला आवाज (Ahilyanagar News)

सरकारने गोहत्या विरोधात कायदा केला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत गो हत्येबाबतचा प्रश्न मांडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गो हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही शहरातील कत्तलखाने सुरू असल्याचं कालच्या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे. शहरातील या कत्तलखान्यांना नेमका कोणाचा आश्रय आहे यावर प्रश्नचिन्ह आहे.