Robbery : संघटितपणे दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Robbery : संघटितपणे दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

0
Robbery : संघटितपणे दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
Robbery : संघटितपणे दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Robbery : नगर : दरोडे (Robbery), जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे सत्र सुरू ठेवणार्‍या कुख्यात भोसले टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca act) कायद्यांतर्गत येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नागेश भोसले आणि त्याचे साथीदार अशी एकूण १० जणांची टोळी संघटितपणे गुन्हे (Crimes) करत असल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

अवश्य वाचा: अतिवृष्टी बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- मंत्री विखे पाटील

दमदाटी करून सोन्याचे दागिने हिसकावले

पारनेर तालुक्यातील पठारवस्ती, सोबलेवाडी येथील २५ जानेवारी रोजी एका घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी सळई व लाकडी दांडक्याच्या जोरावर त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांना दमदाटी करून सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या तपासात सिध्देश सादीश काळे, अजय सादीश काळे, धीरज सादीश काळे, नागेश विक्रम भोसले, गणेश सुरेश भोसले, बाळू झारू भोसले, आवड्या उर्फ टुब्या भोसले, श्रीहरी हरदास चव्हाण, देवीदास जैनू काळे आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी काही संशयित आरोपींना अटक केली असता त्यांनी पारनेर, सुपा, एमआयडीसी, भिंगार कॅम्प व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

नक्की वाचा: मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

आरोपींच्या टोळीचे संघटितपणे गुन्हे (Robbery)

संशयित आरोपींची टोळी संघटितपणे गुन्हे करत असल्यामुळे, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशावरून गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करण्यात आली. त्यानंतर भोसले टोळीविरूध्द भक्कम पुरावे गोळा करून अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता यांच्या पूर्वपरवानगीवरून मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. नागेश भोसले व त्याच्या टोळीवर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यासाठी तात्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी, पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहायक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ तसेच पोलीस अंमलदार रवींद्र पांडे, निखिल मुरूमकर, अभिजीत बोरूडे, सचिन वीर, विवेक दळवी यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.