Crime News: शिरवळमध्ये तरुणावर गोळीबार;घटना सीसीटीव्हीत कैद

0
Crime News:शिरवळमध्ये तरुणावर गोळीबार;घटना सीसीटीव्हीत कैद
Crime News:शिरवळमध्ये तरुणावर गोळीबार;घटना सीसीटीव्हीत कैद

Crime News: शिरवळ (ता.खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून (Young man shoot) त्याच्या हत्येचा प्रयत्न (Attempted murder) करण्यात आला आहे. यावेळी एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख हा जखमी (Injured) झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह समोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली. गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद (CCTV Footage) झाला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर मध्ये ठराविक जागीच गोमांस का आढळून येतयं?

नेमकं काय घडलं ? (Crime News)

शिरवळच्या विश्राम गृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला.या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.

अवश्य वाचा : मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार  
गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे.

पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार (Crime News)

पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.