Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  

Beed Railway

0
Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  
Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  

Beed Railway : नगर : बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे आज रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच धावली आहे. मराठवाड्यातील बीडकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आज नव्याने उभारण्यात आलेल्या बीड रेल्वे (Beed Railway) स्थानकावर पार पडला. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बीड (Beed) ते अहिल्यानगर (Ahilyangar) प्रवासासाठी मार्गक्रमण केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेच्या उपस्थितीत हा सोहळा राजकीय टोळ्यांनी गाजला आहे.

Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  
Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  

अवश्य वाचा: अतिवृष्टी बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- मंत्री विखे पाटील

प्रवासात एकूण १५ रेल्वे स्थानक असणार

बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या १६७  किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे, बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येईल. विशेष म्हणजे या प्रवासाचे तिकीटदरही समोर आले असून कमीत कमी १० रुपये ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच, बीडहून केवळ ४० रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण १५ रेल्वे स्थानक असणार आहे. पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीडवरुन फक्त १० रुपयांत येथे जाता येईल. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग २६१ किमीचा आहे. त्यापैकी, आज फक्त बीड-अहिल्यानगर या १६६ किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अजून बाकी आहे.

Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  
Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  

नक्की वाचा: मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचे तिकीट ४० रुपये (Beed Railway)

बीडचे नवे रेल्वे स्टेशन हे बीड बस स्टँडपासून ६ किलोमीटर दूर पालवण गावात आहे. बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचे तिकीट ४० रुपये एवढे ठेवण्यात आलं आहे. मात्र, बीड शहरापासून ६ किमी दूर असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षावाले १५० ते २०० रुपयांपर्यंत भाडे आकारू शकतात, असे सांगण्यात येते.

Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  
Beed Railway : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…  

बीडमधून अहिल्यानगरसाठी दुपारी १ वाजता निघणार ट्रेन

बीड-अहिल्यानगर रस्ता कापण्यासाठी रस्त्याने अडीच ते पावणे तीन तास लागतात. मात्र, या रेल्वेने किमान ५.३० तास लागणार आहेत. कारण, सरासरी डेमू रेल्वेचा वेग ३० किमी प्रती तास असेल. या मार्गावर दररोज एक गाडी येणार असून गाडी क्रमांक ७१४४१, सकाळी ६.५५ वाजता अहिल्यानगर वरुन निघणार असून ती १२. ३० वाजता बीडला पोहोचणार आहे. तर, तीच गाडी क्रमांक ७१४४२, दुपारी एक वाजता परत अहिल्यानगरसाठी जाणार असून सायंकाळी ६.३० वाजता अहिल्यानगरला पोहोचणार आहे. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.