BJP : शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

BJP : शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

0
BJP : शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव
BJP : शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

BJP : नगर : शहरातील कचरा (Garbage) उचलला जात नसल्याने ठीक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व रोगराई पसरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून टाकण्याचा इशारा भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना (Commissioner) दिला.

अवश्य वाचा : बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरु; प्रवास भाडे किती? जाणून घ्या सविस्तर…

भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला

शहरातील कचरा, घाणीचे साम्राज्य, भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि बाजारपेठांतील वाढते अतिक्रमणे या नागरी समस्यांवर भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१८) आयुक्त यशवंत डांगे यांना घेराव घातला.

नक्की वाचा: ‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करावी; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (BJP)

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर भाजपचे अजय चितळे, नीरज राठोड, मयूर ताठे, सोमनाथ जाधव, करण कराळे, अमोल निस्ताने, बाळासाहेब भुजबळ, गोपाल वर्मा, शिरीष जानवे, महेश गुगळे, चंदन बारटक्के, विजय गायकवाड, अजित कोतकर, बाबासाहेब सानप, महेश तवले, रामदास आंधळे, अजित बोरुडे, पुष्कर तांबोळी, संपत नलावडे, मनोज दुल्लम, बंटी दापसे, महेश नामदे, विशाल खैरे, पल्लवी जाधव, अर्चना बनकर व दत्ता गाडळकर आदींसह पदाधिकारी उपस्थित.


बाबासाहेब वाकळे म्हणाले, गेल्या दोनतीन महिन्यांपासून शहरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. आयुक्त सांगतात की रोज दीडशे टन कचरा उचलला जातो तरीही जागोजागी कचऱ्याचे ढीग कसे काय आहेत. या समस्यावर ८ दिवसात उपाययोजन राबवावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.