Sexual Assault : राहुरी तालुक्यात चार बहिणींवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

Sexual Assault : राहुरी तालुक्यात चार बहिणींवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

0
Sexual Assault : राहुरी तालुक्यात चार बहिणींवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात
Sexual Assault : राहुरी तालुक्यात चार बहिणींवर लैंगिक अत्याचार; आरोपी ताब्यात

Sexual Assault : नगर : राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने एकाच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचं शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे, हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीसह (Accused) त्याच्या पत्नीला देखील अटक केली.

अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

चारही पीडित मुलींची सुटका

या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला. पीडित मुलींपैकी सज्ञान असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर दोघांनी तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस अंमलदार राहुल यादव, शकूर सय्यद, गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, मीना नाचन, वंदना पवार यांचे पथक तयार करून पोलीस पथकासह कार्यकारी दंडाधिकारी सोपान बाचकर व पंचासमक्ष मिळालेल्या माहितीची खात्री करून चारही पीडित मुलींची सुटका करून आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली (Sexual Assault)

या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकाने वारंवार अत्याचार करणे ही संतापजनक बाब असल्याचे सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.