Warrant : ठेवीदारांची रक्कम बुडवली; रावसाहेब पटवर्धन च्या सर्व संचालकांविरुद्ध वॉरंट आदेश

Warrant : ठेवीदारांची रक्कम बुडवली; रावसाहेब पटवर्धन च्या सर्व संचालकांविरुद्ध वॉरंट आदेश

0
Warrant : ठेवीदारांची रक्कम बुडवली; रावसाहेब पटवर्धन च्या सर्व संचालकांविरुद्ध वॉरंट आदेश
Warrant : ठेवीदारांची रक्कम बुडवली; रावसाहेब पटवर्धन च्या सर्व संचालकांविरुद्ध वॉरंट आदेश

Warrant : नगर: अहिल्यानगर येथील बहुचर्चित रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (Raosaheb Patwardhan Urban Cooperative Credit Society Limited) तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था (Pravara Urban Cooperative Credit Society) पाईपलाईनरोडच्या सर्व संचालका विरुद्ध ठेवीदारांची ठेव न दिल्याने वॉरंट (Warrant) काढले आहे.

या प्रकरणात ठेवीदार शंकरराव छबुराव घटे, शीला शंकरराव घटे, विक्रम शंकरराव घटे (रा. गंगा अपार्टमेंट तोफखाना अहिल्यानगर व सुनंदा विजयकुमार पाटेकर (रा. मांजरी बु. पुणे) यांच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. शारदा लगड, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. विराज लगड व ॲड. प्रतीक्षा मंगलारम यांनी सहाय्य केले.

अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

याबाबतची माहिती अशी की,

ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर येथे रावसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था (पाईपलाईनरोड सावेडी अ. नगर) येथे एकंदरीत रक्कम रुपये २७ लाख ९० हजार ३५६ रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या होत्या. त्या ठेवींची मुदत संपूनही रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, सुभाष विद्याधर रेखी, संतोषकुमार संभाजीराव कदम, नसीर अब्दुल्ला शेख, ॲड. विनायकराव कमलाकर पंडित, लक्ष्मण सखाराम जाधव, भास्कर सीताराम पवार, शरद शंकरराव धोंडे, प्रकाश नथू सोनवणे, संजय गंगाधर मंत्री, शकुंतला भाऊसाहेब चौधरी, संजीवनी संभाजीराव पानसंबळ, आशाबाई हरीष भिंगारदिवे, आदींनी ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत केल्या नाही.

नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार

संचालकांना दिसताक्षणी अटक करण्याचे वॉरंट (Warrant)

याबाबत सर्व संचालका विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीचा निर्णय होऊन जिल्हा तक्रार निवारण आयोगाने ठेवीदारांचे तक्रार अंशतः मंजूर करून सर्व संचालकांनी १ ते १४ यांनी वैयक्तिक रितीने व संयुक्तरीतीने ठेविदारांची रक्कम ६ टक्के व्याजासह देण्यात यावी, अशा प्रकारे एकंदरीत ठेवीदारांची रक्कम २७ लाख ९०हजार ३५६ रुपये व शारीरिक व माणसिक त्रासापोटी रक्कम रुपये १६ हजार तसेच तक्रारीचा खर्च सात हजार रुपये एक महिन्याच्या आत द्यावा. असा आदेश २१ नोव्हेंबर २०२४ झाला होता. या आदेशाची सर्व संचालकांनी पालन न केल्याने या ठेवीदारांनी पुन्हा जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे संचालकांच्या विरुद्ध त्यांनी ठेवीदारांची व्याजासह रक्कम रुपये ४२ लाख ९२ हजार ३१७ दिली नसल्याने वॉरंट काढून त्यांना जेलमध्ये टाकावे म्हणून विनंती केली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर यांचे अध्यक्ष प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे, सदस्य चारुशीला विनोद डोंगरे व दुसऱ्या सदस्या संध्या श्रीपती कसबे यांनी संचालकांना दिसताक्षणी अटक वॉरंट काढले आहे.