Traffic Diversion : नगर : नवरात्र उत्सवाच्या (Navratri) पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे-छत्रपती संभाजीनगर, मनमाड-दौंड, कल्याण-पाथर्डी हायवेवरून येणाऱ्या वाहतुकीस पर्यायी मार्गाने (Traffic Diversion) वळविण्याची सुधारित अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी जारी केली आहे.
अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव
अशी वळविण्यात आली वाहतूक
छत्रपती संभाजीनगर-मनमाड या शहराकडून येऊन पुणे व कल्याणकडे जाणारी जड वाहतूक शेंडी-निंबळक-केडगाव मार्गे पुणे व कल्याण शहराकडे वळविण्यात आली आहे. तर पुण्याकडून येऊन मनमाड व छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणारी जड वाहतूक केडगाव-निंबळक-शेंडी मार्गे मनमाड व छत्रपती संभाजीनगर शहराकडे वळविण्यात आली आहे.
नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार
मालवाहतुकीस शहरात पहाटे ३ ते रात्री १० पर्यंत बंदी (Traffic Diversion)
अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस (हलकी व अवजड) पहाटे ३ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत बंदी राहील. यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्याची वाहतूक करणारी व निवडणूक कर्तव्यावरील वाहने वगळण्यात आली आहेत. मात्र, रात्री १० वाजेपासून सकाळी ३ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाईल. तसेच, रात्री १० वाजेपासून सकाळी ३ वाजेपर्यंतचा कालावधी वगळता इतर वेळेत अहिल्यानगर शहर हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक जागांवर किंवा रस्त्याच्या आजूबाजूस हलकी व अवजड मालवाहू वाहने उभी करण्यास किंवा पार्किंग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.