Beating : किरकोळ वादातून तरुणांना मारहाण; सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल

Beating

0
Beating : किरकोळ वादातून तरुणांना मारहाण; सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल
Beating : किरकोळ वादातून तरुणांना मारहाण; सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल

Beating : नगर : सिनेमागृहात (Cinema Hall) सुरू झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून काही अनोळखी व्यक्तीनी शहरातील एका तरूणासह त्याच्या मित्रांना मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवनाथ ऊर्फ बाळासाहेब बारस्कर (वय ३६ रा. सावेडी) यांनी शुक्रवारी (ता.१९) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा ते सात जणांविरूध्द गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

चित्रपट सुरू असताना गोंधळ घालून आरडाओरडा

फिर्यादी नवनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता. १८) ते आपल्या मित्रांसह चित्रपट पाहण्यासाठी सिनेलाईफ थिएटर (जुडीओ बिल्डिंग, नगर कॉलेज शेजारी) येथे गेले होते. चित्रपट सुरू असताना सहा-सात अनोळखी इसमांनी गोंधळ घालून आरडाओरडा केला. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्यांना समज दिली. याचा राग अनोळखी इसमांनी मनात धरला.

नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार

जमाव जमवून फिर्यादीवर हल्ला (Beating)

चित्रपट संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र सिनेमागृहातून बाहेर पडून घरी जाण्यास निघाले असता, अहमदनगर कॉलेज गेटसमोरील एस. के. चायनीजजवळ हेच इसम पुन्हा गाठून जमाव जमवून फिर्यादीवर हल्ला केला. यावेळी त्यांच्या मदतीला आलेल्या मित्रांनाही संशयित आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. झटापटीत ओम लक्ष्मीकांत रासणे यांची सोन्याची चैन चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.