Crime : नगर : विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर त्या तरूणाने पीडित तरूणीचे दोन विवाह (Marriage) मोडवून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या (Death Threat) दिली. नगर शहरात राहणाऱ्या पीडित २७ वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून (Complaint) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार
मोबाईल आणि सोशल मीडियाव्दारे संपर्क
अजिंक्य जऱ्हाड (ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादीची २०२३ साली विवाह नोंदणी संकेतस्थळावर अजिंक्य सोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाव्दारे संपर्क सुरू झाला.
नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
फिर्यादीत म्हटले आहे, (Crime)
अजिंक्यने फिर्यादीला विविध आमिषे दाखवून पुण्यातील कल्याणी नगर भागात तसेच नगर शहरातील दोन हॉटेलमध्ये बोलावून हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडितेच्या वडिलांनी तिचे विवाह जमवण्याचा प्रयत्न केला असता, अजिंक्यने तिच्या होऊ घातलेल्या दोन विवाहांमध्ये हस्तक्षेप करून विवाह मोडवून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.